
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील एजे आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडतेय. एजे आणि लीला ही एकमेकांच्या विरोधी स्वभावाची जोडी एकत्र येईल का, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

या दोघांचा साखरपुडा पार पडल्यानंतर आता मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. जसा साखरपुडयात ट्विस्ट आला होता तसंच मेहंदीच्या कार्यक्रमातही काही हंगामा होणार का? एजे आणि लीलाचं लग्नकार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ही जोडी इतर जोड्यांपेक्षा वेगळी आहे. मेहंदीमध्ये लीलाने एक घोळ घातला आहे. पण ती यामध्ये एकटी नाही. जहागीरदारांसमोर अडचण उभी करण्यासाठी कोणाचे प्रयत्न चालू आहेत, हे आगामी भागांमध्ये पहायला मिळेल. हा सगळा गोंधळ एकीकडे चालू असतानाही मेहंदीची लगबग सुरु आहे.

एजेचा मेहेंदी सोहळा हा साधा नक्कीच नसणार. या सोहळयात मराठी चित्रसृष्टीतला एक चेहरा हजेरी लावणार आहे. या मेहंदी सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास परफॉर्मन्स होणार आहे.

अभिराम जहागीरदार आणि लीलाचा मेहंदी सोहळा निर्विघ्न संपन्न होईल का? आणि संपन्न झाला तरी या दोघांचं लग्न होईल का? एजेच्या सुना या लग्नामध्ये काही अडथळे आणतील का? हे पाहणे खूप रंजक असणार आहे.