
झी मराठी वाहिनीवरील नवीन मालिका 'नवरी मिळे हिटलरला' अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. एजे आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. ही मालिका आता अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.

मालिकेच्या पुढील भागात सीता रूपात लीला एजेच्या घरी येते आणि त्याच वेळी विश्वरूपने लीलाचा अपमान करण्यासाठी पत्रकारांना घरी बोलावून घेतलं आहे.

दुर्गा लीलाच्या बाबांचा अपमान करते की तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय. तेव्हा लीला सांगते की मी लग्नासाठी नाही तर ऑडिशनसाठी आले होते. या अंकलसोबत लग्न करायला कोण तयार होणार, असंच ती थेट म्हणते.

दुसरीकडे एजेच्या आईला मात्र लीला पसंत पडली आहे. ती एजेला सांगते की लीलामध्ये तिला अंतरा दिसते. तर दुसरीकडे लीलाला धडा शिकवायचा म्हणून लक्ष्मी तिचा फोटो पेपरमध्ये छापते आणि तिची बदनामी करण्याचा प्रयत्न करते.

संपूर्ण घटनेनंतर एजे लीलाच्या आई-वडिलांची माफी मागायला तिच्या घरी जातो आणि त्याचवेळेस तो लीलाला लग्नाची ऑफर देतो. आता एजेच्या लग्नाच्या मागणीला लीलाचं काय उत्तर असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.