
गोविंदासोबत गुपचूप डेटिंग सुरु होतं का? अफेअरच्या चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन. बॉलिवूडमध्ये एकेकाळी निलम कोठारी आणि गोविंदाच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. ते अनेक चित्रपटात एकत्र दिसलेले.

निलम आणि गोविंदाने पहिल्यांदा इल्जाम चित्रपटात एकत्र काम केलेलं. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना भरपूर आवडलेली. असं ऐकण्यात आलेलं की, निलमला पाहून पहिल्या नजरेत गोविंदा तिच्या प्रेमात पडलेला. दोघांनी एकत्र 14 हिट सिनेमे दिले.

आता निलमने इतक्या वर्षांनी एका लेटेस्ट इंटरव्यूमध्ये गोविंदा सोबत अफेअरच्या असल्याच्या चर्चांचा इनकार केला आहे. लिंकअप्स हा सगळ्या गेमचा एक हिस्सा असतो. लोकांना जे छापायचं होतं, ते छापलं. स्पष्टीकरण देणारं कोणी नसायचं.

त्यावेळी आम्ही प्रेसला घाबरायचो. दोन-तीन चित्रपट एकत्र केले की, लोक म्हणायचे तुम्ही डेटिंग करताय. गोविंदा त्याच्या एका जुन्या मुलाखतीत बोललेला की, निलम ती व्यक्ती आहे, कोणीही तिला आपलं ह्दय देईल. मी सुद्धा माझं ह्दय दिलं होतं.

एकदा सुनीता निलमबद्दल असं काही बोलली की, त्यामुळे गोविंदाने सुनीता सोबत साखरपुडा तोडला होता. तो सुनिताला निलमसारखं बनायला सांगायचा. गोविंदाने कबुली दिलेली निलमसोबत त्याला लग्न करण्याची इच्छा होती. पण निलमची अशी इच्छा नव्हती.