गाणं पाहिजे तर असं, 51 वर्षानंतरही प्रचंड हिट, ज्यात नीतू कपूरने सासऱ्यांसोबत केलेला रोमान्स, ऐकताच मन…
51 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्यामध्ये नीतू कपूरने सासऱ्यांसोबत केलेला रोमान्स, गाणं ठरलेलं सुपरहिट. आजही लोक ऐकताच जुन्या आठवणींमध्ये रमून जातात.

नीतू कपूर सध्या तिच्या आगामी ‘दादी की शादी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून तिची मुलगी रिद्धिमा कपूर अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. 67 वर्षीय नीतू कपूरने आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नीतू कपूरने 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या दीवार या सुपरहिट चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शशी कपूर यांसारखे दिग्गज कलाकार झळकले होते. ‘दीवार’मध्ये नीतू कपूर आणि शशी कपूर यांनी प्रेमी-प्रेमिकेची भूमिका साकारली होती.

या चित्रपटातील ‘कह दूं तुम्हें या चुप रहूं’ हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. आजही हे गाणे प्रेक्षक मोठ्या आवडीने ऐकतात. गाण्यातील नीतू कपूर आणि शशी कपूर यांची रोमँटिक केमिस्ट्री विशेष चर्चेत राहिली होती. चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले होते.

विशेष म्हणजे, पुढे नीतू कपूरने शशी कपूर यांचे पुतणे ऋषी कपूर यांच्याशी 1980 मध्ये विवाह केला. त्यामुळे लग्नाआधीच त्यांनी आपल्या भविष्यातील सासऱ्यांसोबत पडद्यावर रोमांस केला होता, ही बाब आजही चर्चेचा विषय ठरते.

नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांना दोन मुलं आहेत. एक अभिनेता रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर. कपूर कुटुंब हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक मानले जाते.