8 वर्षांपर्यंत नाकारलं प्रपोजल; प्रेग्नंट होताच अभिनेत्रीने लग्नाला दिला होकार

या अभिनेत्रीने लग्नाच्या सहा महिन्यांतच मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे ती लग्नाआधीच गरोदर होती, अशा चर्चांना उधाण आलं होतं. तर प्रेग्नंसीमुळेच लग्नाला होकार दिल्याचा खुलासा आता या अभिनेत्रीने केला आहे.

| Updated on: Apr 29, 2026 | 3:49 PM
1 / 5
अभिनेत्री नेहा धुपियाने 2018 मध्ये अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलं. लग्नाच्या सहा महिन्यांतच तिने बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्यावरून नेहाला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने प्रेग्नंसीमुळेच अंगदशी लग्नाला होकार दिल्याचा खुलासा केला आहे.

2 / 5
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये अंगदने सांगितलं की तो आठ वर्षे नेहाच्या मागे लागला होता. नेहाला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता आणि सुरुवातीला त्याच्याकडून एकतर्फीच प्रेम होतं. नेहाला त्यावेळी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं होतं. त्यामुळे ती अंगदला होकार देत नव्हती.

3 / 5
नेहा आणि अंगद यांची पहिली भेट जिममध्ये झाली होती. नेहाला अनेकदा विचारूनही ती होकार देत नसल्याचं पाहून अंगदने तिच्या आईसोबत चांगलं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या दोघांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या नात्याला होकार होता. परंतु नेहाने अंगदला अनेक वर्षे प्रतीक्षा करायला लावलं होतं.

4 / 5
या पॉडकास्टमध्ये नेहा पुढे म्हणाली, "सुदैवाने मी गरोदर राहिले आणि आमची मुलगीच आमच्यासाठी आशीर्वाद बनून आली. अन्यथा तुम्ही इथे-तिथे प्रेमाच्या शोधात असता आणि जी व्यक्ती तुमच्यासमोर असते, त्याकडे तुमचं लक्षच जात नाही. अंगद नेहमीच माझ्यासोबत होता. आमच्या मुलीने आम्हाला एकत्र आणलं, कारण मी प्रेग्नंट असल्यानेच आम्हाला लग्न करावं लागलं होतं."

5 / 5
एका मुलाखतीत नेहाने लग्नापूर्वीच गरोदर राहण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. "आजसुद्धा मी अशा अनेक अभिनेत्रींबद्दल स्टोरी आणि टॅग पाहते, ज्या लग्नाआधी गरोदर झाल्या आहेत. मला असं वाटतं की मी कमीत कमी नीना गुप्ता आणि आलिया भट्ट यांच्या यादीत मोडते. खरं सांगायचं झालं तर हे खूप हास्यास्पद आहे. अशा गोष्टींवर चर्चा करू नये असं मानण्यापेक्षा याला महिलांनी नॉर्मल करण्याची खूप गरज आहे", असं ती म्हणाली होती.

Follow Us