
गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चांगलीच चर्चेत आहे. पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसहसोबत ती लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे.


‘नेहू दा व्याह’ नावाचं नवं गाणं आज रिलीज झालं आहे. या गाण्यात नेहासोबत गायक रोहनप्रीतही झळकला आहे. ‘नेहू दा व्याह’ या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न दाखवण्यात आले आहे. त्यामुळे तिचे चाहते आता पुन्हा एकदा बुचकळ्यात पडले आहेत.

काही दिवसांपूर्वी नेहा आणि रोहनप्रीतने त्यांच्या ‘रोका’ सेरेमनीचा व्हिडीओ शेअर केला होता. यात दोघेही आनंदात डान्स करताना दिसले होते. हा व्हिडीओ शेअर करत नेहाने तिचे आगामी गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, रोहनप्रीत सिंह आणि नेहा कक्कर या महिन्याच्या शेवटच्या तारखेला विवाह करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘रोका’नंतर दोघांमध्येही लग्नाविषयी फायनल चर्चा झाली असल्याचं म्हटलं जातं.