Nepal Floods : नेपाळला जसं अंधारात ठेवलं तसं चीनने..बॉर्डरजवळ चीन बांधत असलेलं विशालकाय धरण भारतासाठी वॉटर बॉम्ब ठरणार का?
Nepal Flood Disaster : नेपाळच्या जलप्रलयाने भारताची चिंता वाढवली आहे. या भीषण पुरात आतापर्यंत 162 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 750 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. यात 133 भारतीय आहेत. तिबेटच्या डोंगर रांगांमधून आलेल्या महापुरात आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भिती आहे. नेपाळ या विनाशासाठी चीनला जबाबदार ठरवत आहे. बुधवारी चीनच्या केरुंग भागात तलाव फुटला. चीनने याची माहिती कळवली नाही. त्यामुळे 2 कोटी घन मीटर पाणी नेपाळमध्ये शिरलं.

चीनने आधी अलर्ट केलं असतं तर आम्ही सतर्क राहिलो असतो असं नेपाळचं म्हणणं आहे. वेळेवर माहिती मिळाली असती, तर आम्ही अलर्ट झालो असतो असा विद्ध्वंस घडला नसता. चीनमुळे नेपाळमध्ये हा महापूर आला. चीनमध्ये आधी पूर आला, तर त्यांनी अलर्ट का केलं नाही?. (Getty Images)

नेपाळमध्ये पुरामुळे जी हाहाकाराची स्थिती निर्माण झालीय, त्याला खरचं चीन जबाबदार आहे का?. भारताच्या सीमेजवळ बनणारं चीनचं धरण हे वॉटर बॉम्ब सारखं आहे का?. (Getty Images)

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे नेपाळमध्ये मोठा विनाश झाला आहे. त्यामुळे भारताचं टेन्शन देखील वाढलं आहे. ही नदी तिबेटच्या शिशापांगमा पर्वत रांगेतून निघते व नेपाळमध्ये प्रवेश करते. ही नदी नेपाळच्या सिंधुपालचौक आणि रसुवा जिल्ह्यातून वाहते. (Getty Images)

या विद्धवंसाने चीन बांधत असलेल्या विशाल धरणाबद्दल विचार करण्यास भाग पाडलं आहे. भारतीय सीमेजवळ चीन हे धरण बांधत आहे. चीन अरुणाचल सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. हिमालयाच्या भूकंप प्रवण क्षेत्रातील हा भाग आहे. (Getty Images)

अनेक दशकापासून चीनच्या या प्रकल्पाची चर्चा आहे. बीजिंगने आठ महिन्यांपूर्वी या प्रोजेक्टला मंजुरी दिली. जुलै 2025 मध्ये न्यिंगची भागात या धरणाचं बांधकाम सुरु झालं आहे. हा प्रकल्प यारलुंग त्सांगपो नदीच्या एका मोठ्या वळणावर आहे. (Getty Images)

नदी इथे वेगाने वळते. त्यानंतर भारतात ती सियांद नदी बनते. असममध्ये या नदीला ब्रह्मपुत्र म्हणतात. या योजनेतंर्गत 250 किलोमीटर लांब खोऱ्यात पाच धरणं बांधली जाणार आहेत. नदीच्या छोट्या भागावर जवळपास 2000 मीटर उंचीवरुन पाणी पडेल. त्यापासून वीज निर्मिती होईल. 2033 च्या आसपास हा प्रोजेक्ट पूर्ण होईल. याची क्षमता 60 गीगावॅट असेल. (Getty Images)

वर्षाला जवळपास 300 अब्ज यूनिट वीज बनेल. चीनला हे विशालकाय धरण बांधण्यासाठी जवळपास 137 ते 170 अब्ज डॉलरच्या आसपास खर्च येईल. भूवैज्ञानिकांच्या मते सर्वात मोठी चिंता प्रकल्पाचा आकार नाही, तर त्याचं स्थान आहे. मेडोग फॉल्ट जोनच्या जवळ आहे, जिथे भारतीय आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटस मिळतात. म्हणून हा भाग भूकंपाच्या दृष्टीने खूप संवेदनशील आहे. (Getty Images)

मोठे भूकंप पचवण्यासाठी भले भूकंपरोधी यंत्रणा त्या धरणामध्ये असेल, पण भूकंपामुळे आसपासच्या डोंगररागांमध्ये भूस्खलन, दरड कोसळणं, चिखल माती वाहून येण्यासारख्या घटना घडू शकतात. यामुळे नदी आणि खालच्या भागात मोठं नुकसान होऊ शकतं. (Getty Images)

भले, धरण सुरक्षित राहील पण भारताकडे खालच्या बाजूला नुकसान होऊ शकतं. 2000 साली तिबेटच्या वरच्या भागात एक धरण फुटलेलं. परिणामी ईशान्येकडच्या काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली. 2017 साली अरुणाचल प्रदेशातून वाहणारी सियांग नदी अचानक काळी झालेली. (Getty Images)

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी चीनच्या मेडोग प्रोजेक्टला ‘वॉटर बॉम्ब’ म्हटलं आहे. नदीच्या वरच्या बाजूला बनणाऱ्या धरणामुळे सियांग नदीचं पाणी रोखलं जाईल. अचानक भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाईल. भारताने बीजिंगसमोर आपल्या चिंता सांगितल्या. (Getty Images)