AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा

आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा

| Updated on: Aug 27, 2026 | 2:44 PM
Share

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. सरकारने सहा आरोपींना अटक केल्याचे सांगत, बन यांनी रोहित पवारांना सुनील गाडवे यांच्याशी असलेल्या संबंधांवरून प्रश्न विचारला. सुनील गाडवे हे रोहित पवारांचे उजवे हात असून, रोहित पवारांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी बन यांनी केली आहे.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणात नवनाथ बन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. सरकारने आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असून, यात एमपीएससीच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे, असे बन यांनी स्पष्ट केले. सरकार कोणालाही पाठीशी घालत नसून, दोषींवर कठोर कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. बन यांनी रोहित पवारांवर बेगडी राजकारण करत असल्याचा आरोप केला. त्यांनी रोहित पवारांना सुनील गाडवे यांच्याशी असलेल्या संबंधांवरून प्रश्न विचारला.

“सुनील गाडवे हे रोहित पवारांचे राईट हॅन्ड म्हणून काम करत आहेत,” असा दावा नवनाथ बन यांनी केला. सुनील गाडवे यांचा भारतीय जनता पक्षाशी सध्या कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी नमूद केले. अभिमन्यू पवार यांचे सुनील गाडवे कधीही पीए नव्हते, मात्र रोहित पवारांनी स्वतः सुनील गाडवे यांच्यासोबतच्या संबंधांवर पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी बन यांनी केली आहे.

Published on: Aug 27, 2026 02:44 PM

Follow Us