AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hybrid home loan: हायब्रिड होम लोन म्हणजे काय? EMI वाढीचा का होत नाही परिणाम? एका क्लिकवर जाणून घ्या

Hybrid Home Loan: घर खरेदीसाठी अनेकजण गृहकर्ज घेतात. ईएमआय वाढला तर त्यांचे बजेट हुकते. अशावेळी हायब्रिड गृहकर्ज तुमच्या फायद्याचे ठरू शकते. काय आहे त्याचे फायदे?

Hybrid home loan: हायब्रिड होम लोन म्हणजे काय? EMI वाढीचा का होत नाही परिणाम? एका क्लिकवर जाणून घ्या
हायब्रिड होम लोन
| Updated on: Aug 27, 2026 | 2:36 PM
Share

घर खरेदी करणे हा जीवनातील सर्वात मोठा आर्थिक निर्णयांपैकी एक असतो. गृहकर्ज घेतल्यानंतर अनेक वर्षांपर्यंत प्रत्येक महिने EMI ची फेड करावी लागते. या दरम्यान जर RBI रेपो दरात बदल करत असेल तर बँक या त्यांच्या व्याजदरात बदल करतात. त्यात गृहकर्जाच्या व्याजाचाही समावेश असतो. त्याचा EMI वा कर्जाच्या कालावधीवर परिणाम होतो. अशावेळी हायब्रिड होम लोन हा (What is hybrid home loan) एक चांगला पर्याय ठरू शकतो. काही दिवसांपूर्वी Kotak Mahindra Bank ने हायब्रिड गृहकर्ज लाँच केले. यामध्ये ग्राहकांना सुरुवातीच्या काही वर्षांसाठी व्याजदर आणि EMI लॉक केल्या जाऊ शकते. बँकेनुसार, ग्राहक 39, 52 वा 65 महिन्याच्या कालावधीत व्याजदर निश्चित करता येते. त्यानंतर गृहकर्ज फ्लोटिंग रेटनुसार बदलू शकते.

काय आहे Hybrid Home Loan?

हायब्रिड होम लोन काय असा सवाल अनेकांना पडला असेल. फिक्स्ड आणि फ्लोटिंग रेट या पर्यायातून त्यावर लक्ष ठेवता येईल. फ्लोटिंग रेट होम लोननुसार व्याजदर हा बदलतो. त्याचा थेट परिणाम तुमच्या ईएमआय आणि त्याच्या कालावधीवर पडतो. तर हायब्रिड होम लोनमध्ये सुरुवातीला एका निश्चित कालावधीसाठी व्याजदर एकच असतो. या दरम्यान आरबीआयचे व्याजदर कमी अथवा जास्त झाले तरी तुमचा गृहकर्जाचा व्याजदर एकच राहतो. त्यात बदल होत नाही.

उदाहरणासह समजून घ्या

समजून घ्या कर्जदाराने 1 कोटी रुपयांचं गृहकर्ज घेतले असेल. तर अशावेळी सुरुवातीच्या 65 महिन्यांचे व्याजदर निश्चित असते. यादरम्यान रेपो रेट वाढला आणि बाजारात गृहकर्जावरील व्याजदर वाढला, तर निश्चित कालावधीत ईएमआय जैसे थे राहील. त्यात बदल होणार नाही. म्हणजे सुरुवातीला काही वर्षांत आरबीआयने व्याजदर वाढवला तर त्याचा परिणाम फिक्स्ड होम लोनवर कोणताही परिणाम होणार नाही. या कालावधीत व्याजदर वाढीचा परिणाम होणार नाही. पण व्याजदर कमी झाले तरी त्याचा फायदा ग्राहकांना होत नाही.

असा होतो फायदा

1. सुरुवातीच्या काळात ग्राहकाला मोठा फायदा

घर खरेदीसाठी सुरुवातीच्या वर्षात कुटुंबासाठी आणि इतर खर्चही असतो. घरातील इंटिरिअर, मुलांचे शिक्षण, बचत आणि नियमित खर्चासोबत स्थिर ईएमआय फायदेशीर ठरतो. यामुळे मासिक बजेटवर मोठा परिणाम होत नाही. एक निश्चित खर्चाचा अंदाज लावता येतो. काही रक्कम बचत करून मोठी रक्कम कर्ज रक्कमेत जमा करता येते.

2. व्याजदर वाढीची जोखीम कमी

आता RBI रेपो रेट वाढला तर त्याचा परिणाम गृहकर्जाच्या दरांवर पडतो. फ्लोटिंग रेटच्या कर्जदारांना या दरवाढीचा फटका बसतो. त्यांचा कर्जाचा कालावधी वाढू शकतो. हायब्रिड लोन हे फिक्स्ड कालावधीत एक सुरक्षा देते. या कालावधीत ईएमआय वाढण्याची भीती, चिंता नसते.

Follow Us
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक
Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग