AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit : प्रश्नांची सरबत्ती, स्वप्नांची कहाणी अन् मोहक अदा; ‘कोण होणार करोडपती’साठी माधुरीने का दिला होकार ?

Madhuri Dixit : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित 'कोण होणार करोडपती' मराठीच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. तिच्या चाहत्यांसाठी हा एक अनोखा अनुभव असून होस्ट म्हणून तिचा अंदाज पहायला सगळेच उत्सुक आहेत.

Madhuri Dixit : प्रश्नांची सरबत्ती, स्वप्नांची कहाणी अन् मोहक अदा; ‘कोण होणार करोडपती’साठी माधुरीने का दिला होकार ?
Actress Madhuri Dixit will host Marathi KBC
| Updated on: Aug 27, 2026 | 2:25 PM
Share

Madhuri Dixit : मधुर हास्य, मन मोहून टाकणाऱ्या अदा आणि ग्रेसफुल वावार याने बॉलिवूडवर आणि लाखो प्रक्षेकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी अभिनेत्री… अर्थात माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) ! मोठ्या पडद्यावर तिचा वावपर सध्या पार नसल तरी तिची एक झलक दिसताच चाहते खुश होतात. तिच्या चाहत्यांसाठी सध्या खुशखबर म्हणजे मोठ्या पडद्याची ही अनभिषिक्त सम्राज्ञी लवकरचत छोट्या पडद्यावर दिसल आहे. ‘कौन बनेगा करोडपति’ या प्रसिद्ध क्विझ शोचं मराठी व्हर्जन ‘कोण होणार करोडपती’ हेही खूप गाजलं असून आता चक्क माधुरी या शोमध्ये दिसणार आहे, तेही सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून एखाद्या भागापरुती नव्हे तर ती या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. या शोसाठी माधुरीचे चाहते तर खूप एक्सायटेड आहेतच पण माधुरीलाही खूप उत्सुकता आहे,

या शोमध्ये स्पर्धकांच्या कहाण्या, त्यांची स्वप्न आणि संघर्ष, त्यांच्या जीवनाबद्दल जवळून जाणून घ्यायला मिळेल, असा विश्वास माधुरीने व्यक्त केला. मात्र जेव्हापासून माधुरी हाँ शो होस्ट करणार असलयाची घोषणा झाली, तेव्हापासून अनेकांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होतोय की माधुरीने या शोची निवड का केली ? त्याचं कारणंही माधुरीने स्पष्ट केलं.

का दिला या शो ला होकार ?

या शोला होकार देण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यातील माणुसकीच्या आणि भावनिक कथा.. असं माधुरीने सांगितलं. लोकांची स्वप्नं, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या प्रवासाशी जोडलं जाण्याची संधी मला विशेष भावली, असं ती म्हणाली.य “ (सहभागी स्पर्धक) लोकांच्या कथा ऐकणं आणि त्यांच्या स्वप्नांशी जोडलं जाणं, याने मी खूप जास्त उत्साहित होते. ‘कोण होणार करोडपती’ हा केवळ प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे जिंकण्याचा कार्यक्रम नाही, तर आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी धाडस करण्याचं बळ देणारा शो आहे” असं माधुरीने नमूद केलं.

शो मध्ये दिसणार माधुरीचा अनोख अंदाज

माधुरीच्या मते, ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांना तिची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल. अभिनय करताना कलाकार एखाद्या व्यक्तिरेखेत रमतो, मात्र सूत्रसंचालन करताना स्वतःच्या स्वभावानुसार व्यक्त होण्याची संधी मिळते. याबद्दल बोलताना ती पुढ म्हणाली, “ या शोमध्ये प्रेक्षकांना माझा अधिक उत्स्फूर्त आणि नैसर्गिक अंदाज पाहायला मिळेल, असं मला वाटतं. अभिनेत्री म्हणून एखादी भूमिका साकारताना आपण त्या व्यक्तिरेखेत शिरतो. पण इथे मी स्वतःसारखी राहू शकते, स्पर्धकांशी मनमोकळेपणाने बोलू शकते, त्यांच्या कथा ऐकू शकते आणि त्यांना जवळून जाणून घेऊ शकते.” असं माधुरीने सांगितलं.

स्पर्धकांसोबत होणारे संवाद, त्यांच्यासोबतचे भावनिक क्षण, हास्य-विनोद आणि अचानक घडणारे मजेशीर प्रसंग याबद्दलही मी उत्सुक आहे, असं माधुरीने आवर्जून सांगितलं. “माझ्यासाठी हा शो फक्त प्रश्न आणि उत्तरांपुरता मर्यादित नाही. प्रत्येक स्पर्धकाची स्वप्नं, भावना, त्यांच्यासोबत होणारे मजेदार संवाद आणि त्यांच्याकडून मिळणारे अनपेक्षित क्षणही तितकेच महत्त्वाचे आहेत. मला लोकांशी संवाद साधायला खूप आवडतं. त्यामुळे या खऱ्या आणि अनपेक्षित संवादांची मी आतुरतेने वाट पाहत आहे. स्पर्धक आणि प्रेक्षकांसोबत असे खास क्षण अनुभवता आणि शेअर करता येतील,” अशी आशाही माधुरीने पुढे बोलताना व्यक्त केली.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ