भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्या नियुक्तीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट शिवसेनेत वाद कायम आहे. महेंद्र दळवींनी तटकरेंवर गंभीर आरोप करत येणाऱ्या काळात मूठ उघडल्यास तटकरे तोंड दाखवण्यायोग्य राहणार नाहीत, असा इशारा दिला आहे. याला प्रत्युत्तर देताना अनिकेत तटकरेंनी दळवींच्या अकलेची कीव करत त्यांच्या राजकीय जन्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट शिवसेना यांच्यातील राजकीय वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “येणाऱ्या काळात मूठ उघडली तर तटकरे तोंड दाखवण्याच्या लायकीचे नसतील,” असे वक्तव्य दळवींनी केले आहे. त्यांनी अनेक गोष्टी उघडकीस आणण्याचा इशारा दिला आहे. दळवींच्या या वक्तव्याला अनिकेत तटकरे यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. “महेंद्र दळवींच्या अकलेची कीव करावीशी वाटते,” असे अनिकेत तटकरे म्हणाले.
त्यांनी दळवींनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. अनिकेत तटकरे यांच्या म्हणण्यानुसार, दळवींनी त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि अगदी स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याकरिता सुनील तटकरे यांच्याकडे अनेकवेळा मदत मागितली होती. हा राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे.
Published on: Aug 27, 2026 11:59 AM
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा

