AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khawdya Dongar : चांदगुडे कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीवर मावशीचा मोठा दावा, कमाईचं स्त्रोत काय होतं?

Kunal Chandugade Khavdya Dongar Case : कुणाल याच्या आयफोनच्या हट्टामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा अंत झाला... असं सांगण्यात येत आहे. कुणाल याचे वडील ट्रक ड्रायव्हर होते म्हणून त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. यावर आता कुणाल याच्या मावशीने मोठा दावा केला आहे.

Khawdya Dongar : चांदगुडे कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीवर मावशीचा मोठा दावा, कमाईचं स्त्रोत काय होतं?
| Updated on: Aug 27, 2026 | 2:45 PM
Share

Kunal Chandugade Khavdya Dongar Case : कुणाल चांदवडे आणि त्याच्या आई – वडिलांच्या मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सुरुवातील असं समोर आलं की, कुणाल याच्याकडे आयफोन होता, पण त्याला नवीन आयफोन हवा होता. आयफोनच्या हट्टासाठी कुणाल खवड्या डोंगरावर पोहोचला आणि त्यांने आयफोनची मागणी करत खाली उडी मारण्याची धमकी दिली. तेव्हा त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा देखील मृत्यू झाला. मुलगा आणि पतीचा मृत्यू डोळ्यांनी पाहिल्यानंतर कुणाल याच्या आईने देखील त्याच डोंगरावरून उडी मारुन स्वतःला संपवलं. अशात कुटुंबियांमध्ये वाद देखील सुरु असल्याची माहिती समोर आली. शिवाय त्यांच्या आर्थिक परिस्थितीची देखील चर्चा सुरु झाली. यावर आता कुणाल याच्या मावशीने मोठा दावा केला आहे…

कुणालच्या आई – वडिलांचे वाद

कुणाल याच्या आई – वडिलांबद्दल मावशीने दिलेल्या माहितीनुसार, ‘कुणालला असं पाऊल उचलायचं नव्हतं. भांडण झाल्यानंतर वडिलांनी घर सोडलं होते. अशात आई – वडिलांनी जवळ आणण्यासाठी तो इमोशनल ब्लॅकमेल कराचा… वडील निघून गेल्यामुळे त्याची आई तणावात होती. कुणाल याने वडिलांना फोन केला आणि म्हणालेला, ‘तुम्हा मला सोडून कसे जाऊ शकता? माझ्याकडे परत या. कुणालला आई – वडिलांना एकत्र आणायचं होतं. त्यासाठी तो धडपड करत होता…’ असं मावशी परडे यांनी स्पष्ट केलं…

कुटुंबियांच्या कमाईचं स्त्रोत काय होतं?

आयफोनवरुन अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत, यावर मावशीने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘भावजी ड्रायव्हर असले तरी ते चांगल्या शेतकरी कुटुंबातील आहेत… घरात नोकरीसोबतच शेतीचा पैसा देखील येत होता. त्यामुळे कुटुंबात कोणतीत पैशांची कमतरता नव्हती. आयफोन आता सहज मिळातात. 20 – 25 हजार रुपयांत जुने फोन मिळतात. कुणलला शिक्षणासाठी फोन दिलेला. त्यामुळे श्रीमंतीचा किंवा उधळपट्टीचा आव आणणं चुकीचं’, असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सांगायचं झालं तर, कुणाल चांदगुडेची मावशी कल्याणी परडे यांनी मीडियाशी संवाद साधताना चांदगुडे कुटुंबातील कलह आणि कुणालच्या हत्येचं कारण स्पष्ट केलं. कुटुंबियांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Follow Us
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक
Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा