Balen Shah : नेपाळचे पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा खरा भारतविरोधी चेहरा समोर आला, अवघ्या 45 दिवसात दाखवले आपले रंग
Nepal PM Balen Shah : नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताविरोधात निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. भारतविरोधी नेता अशीच बालेन शाहची ओळख राहिली आहे. काठमांडूचे महापौर असताना बालेन शाह यांनी आदिपुरुष चित्रपट तिथल्या थिएटरमध्ये रिलीज होऊ दिला नव्हता.

बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान बनल्यानंतर भारतासोबतचे संबंध सुधारतील असं वाटलं होतं. पण अलीकडच्या त्यांच्या काही निर्णयांवर नजर टाकली तर ते उलट सातत्याने प्रखर भारतविरोधी भूमिका घेत आहेत असं दिसतं. (Getty Images)

काठमांडू पोस्टनुसार नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना भेटण्यास नकार दिला आहे. मिस्त्री या आठवड्यात नेपाळला जाणार होते. नेपाळ-भारत परराष्ट्र संबंध मजबूत करणं हा या दौऱ्यामागचा उद्देश होता. पण बालेन शाह यांनी मी माझ्या समकक्ष सोबत बैठक करणार असं सांगितलं. त्यानंतर मिस्त्री यांचा दौरा रद्द झाला आहे. अधिकृतरित्या भारताने यावर कुठलीही टिप्पणी केलेली नाही. (Getty Images)

नेपाळच्या नव्या पंतप्रधानाने कालापानी आणि लिपूलेखचा जुना मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. मानसरोवर यात्रेसाठी चीनकडून जारी करण्यात आलेल्या एडवायजरीवर बालेन शाह यांनी नेपाळची सहमती नसल्याचं म्हटलं. कालापानी आणि लिपूलेख हे आपले भाग असल्याचा नेपाळचा दावा आहे. केपी ओली यांच्या कार्यकाळात मॅपही बदलण्यात आला. (Getty Images)

नेपाळच्या तराई प्रांतात राहणारे मधेश नागरिक भारतात सामान विकत घ्यायला यायचे. त्यामुळे त्यांना महागाईपासून दिलासा मिळायचा. पण बालेन सरकारने एक नियम लागू केला. त्यानुसार भारतातून 100 रुपयापेक्षा जास्त किंमतीच सामना विकत घेतलं, तर कस्टम ड्युटी लावली जाणार. त्यामुळे नेपाळच्या सीमावर्ती भागात राहणारे नागरिक संतापले आहेत. (Getty Images)

नेपाळ सरकारने अजून एक नियम लागू केला आहे. आधी नेपाळ सीमेनजीक राहणारे भारतीय नागरिक सहज नेपाळला जायचे. पण आता त्यांना नेपाळला जाण्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागेल. तपासणीशिवाय भारतीय नागरिक नेपाळला जाऊ शकत नाहीत. भारत आणि नेपाळमध्ये 1751 किलोमीटरची खुली सीमा आहे. (Getty Images)