Sim Card : या लोकांना आता सिमकार्ड मिळणार नाही, सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Sim Card Rule : भारतात मोबाईल सिमकार्ड अगदी सहजपणे मिळते, त्यामुळे याचा गैरवापर होण्याचाही धोका वाढलेला आहे. मात्र आता भारतात सिम कार्ड खरेदीचा नियम बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बापू गायकवाड | Updated on: May 11, 2026 | 10:53 PM
1 / 5
दूरसंचार मंत्रालयाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, अल्पवयीनांना सिम कार्ड फक्त पालक किंवा कायदेशीर संरक्षकांच्या संमतीनंतरच द्यावे. त्यामुळे आता 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना सिमकार्ड मिळणार नाही.

दूरसंचार मंत्रालयाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, अल्पवयीनांना सिम कार्ड फक्त पालक किंवा कायदेशीर संरक्षकांच्या संमतीनंतरच द्यावे. त्यामुळे आता 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना सिमकार्ड मिळणार नाही.

2 / 5

हा नवा निर्णय डिजिटल डेटा सुरक्षा कायद्यांतर्गत अंतर्गत घेतला जात आहे. या कायद्यात नागरिकांच्या डेटाचे संरक्षण आणि डिजिटल ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी आहेत. आता विविध मंत्रालये त्यांच्या विभागांमध्ये हे नियम लागू करत आहेत.

3 / 5

दूरसंचार मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये अल्पवयीनांच्या नावावर सिम कार्ड देण्यासाठी पालकांची केवायसी (KYC) आणि परवानगी अनिवार्य करण्यात येणार आहे.

4 / 5

सरकारचे मत आहे की, आजच्या काळात सिम कार्ड हे केवळ कॉल करण्याचे साधन राहिलेले नाही. बँकिंग, OTP व्हेरिफिकेशन, ऑनलाइन KYC आणि डिजिटल अकाउंट्स यांसारख्या अनेक सेवा मोबाईल नंबरशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे नियम आणखी कडक केले जात आहेत.

5 / 5

नवे नियम लागू झाल्यानंतर सिम कार्ड जारी करण्याच्या प्रक्रियेत मजबूत डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीमचा वापर केला जाईल. जर एखाद्या अल्पवयीनाने सिम कार्डसाठी अर्ज केला, तर त्याच्या पालक किंवा संरक्षकांच्या संमतीचा डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित ठेवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us