
भारताची सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत लवकरच नवीन स्वरुपात दिसणार आहे. आतापर्यंत देशात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या होत्या. आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे.

चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत तयार केलेली ही ट्रेन आठ डब्यांची आहे. तिचा रंग आता केसरी (भगवा) आणि ग्रे आहे. तसेच वंदे भारत ट्रेनमध्ये लावण्यात आलेल्या चित्ताच्या लोगोही बदलण्यात आला आहे.

नव्या वंदे भारत ट्रेनमध्ये तब्बल २५ बदल करण्यात आले आहे. केसरी रंगाच्या या रेल्वेच्या ट्रेनचा ट्रायल यापूर्वी झाला आहे. आता लवकरच ती रस्त्यावर धावताना दिसणार आहे. भविष्यात तयार होणाऱ्या सर्व वंदे भारत ट्रेन याच रंगाच्या असतील.

वंदे भारत ट्रेनमधील सीट पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक केल्या आहेत. वॉशबेसिनची खोली वाढवण्यात आली आहे. सीटाचे रिक्लाइनिंग ऐंगल वाढवले गेले आहे. एग्जिक्यूटिव्हा कारच्या श्रेणीतील सीटचा रंग लाल आणि सोनेरी आहे. टॉयलेट्समधील लाइट 1.5 ऐवजी 2.5 वॅटचा केला गेला आहे.

नवीन वंदे भारत ट्रेनचे पडदे जुन्या ट्रेनपेक्षा वेगळे आहेत. एसीसाठी एअर टाइटनेस वाढवण्यात आला आहे. FRP पॅनलला मोडिफाइड पॅनल लावले गेले आहे. एकंदरीत या ट्रेनध्ये 25 बदल केले गेले आहे.