
‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

आता धनश्री लवकरच आई होणार आहे. त्यामुळे धनश्री तिच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेन्ड करताना दिसत आहे.

ती सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतेय. आता तिनं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मस्त हाऊस पार्टी केली आहे. सोबतच जबरदस्त फोटो आणि व्हिडीओसुद्धा काढले आहेत. मित्र-मैत्रिणींसोबत मस्त घरातच तिनं पार्टी एन्जॉय केली आहे.

धनश्रीचे हे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये धनश्री बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे.