मेरे मॉम-डॅडकी शादी, न्यूझीलंडच्या पंतप्रधान बोहल्यावर चढणार, दोन वर्षांची मुलगीही लग्नाला

| Updated on: May 07, 2021 | 9:24 AM

पंतप्रधान पदावर असताना बाळाला जन्म देणाऱ्या अर्डर्न या जगातील दुसऱ्या पंतप्रधान ठरल्या होत्या. (New Zealand Jacinda Ardern Wedding)

1 / 7
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी असताना जेसिंडा अर्डर्न यांनी बाळाला जन्म दिला होता. त्यावेळी त्यांचं लग्न झालं नव्हतं. सध्या त्यांची मुलगी दोन वर्षांची आहे.

2 / 7
40 वर्षीय जेसिंडा यांनी बॉयफ्रेंड आणि टेलिव्हिजन होस्ट क्लार्क गेफोर्डसोबत समर वेडिंग (उन्हाळ्यात लग्न) करण्याचा मानस बोलून दाखवला. न्यूझीलंडमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ उन्हाळ्याचा मानला जातो. हा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीचा असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

3 / 7
पंतप्रधान पदावर असताना मुलाला जन्म देणाऱ्या अर्डर्न या जगातील दुसऱ्या पंतप्रधान ठरल्या होत्या. पदग्रहण करताना त्या गरोदर होत्या.

4 / 7
अनेक वर्षांपासून त्या बॉयफ्रेंड क्लार्क गेफोर्ड यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. 2019 मध्ये जेसिंडा आणि क्लार्क यांनी एंगेजमेंट केली होती. मुलीच्या जन्मानंतर जवळपास दोन वर्षांनी दोघं विवाह करत आहेत.

5 / 7
या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्यास सुरुवातीला जेसिंडा अर्डर्न आणि क्लार्क गेफोर्ड लगीनगाठ बांधतील, असा अंदाज रॉयटर्स वृत्तसंस्थेने वर्तवला आहे. नुकतंच एका रेडिओ शोमध्ये जेसिंडा यांनी लग्नाचा मुहूर्त सापडल्याचं सांगितलं.

6 / 7
 एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने लग्नाआधी बाळाला जन्म देण्याचं उदाहरण विरळाच. विशेष म्हणजे याचा अजिबात बाऊ करण्यात आला नाही. मुलीच्या जन्मानंतर अर्डर्न यांचे बॉयफ्रेंड गेफोर्ड यांनी घरी राहून मुलीचा सांभाळ केला, तर अर्डर्न यांनी देशाची जबाबदारी सांभाळली. जेसिंडा या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधानही ठरल्या आहेत.

7 / 7
 जागतिक व्यासपीठावरही अर्डर्न या मुलीला घेऊन गेल्या होत्या. वडिलांनी घरी राहून बाळाचं पालनपोषण करणं, हाही भारतीय पितृसत्ताक संस्कृतीला धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल.