
अभिनेत्री निया शर्मा ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. 'नागिन' या भूमिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आता ती 'चुडैल'च्या भूमिकेतून टेलिव्हिजनवर परत येतेय.

निया शर्माची नवी मालिका 'सुहागन चुडैल' नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये निया खलनायिकेच्या भूमिकेत आहे. तिच्या ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

या नव्या मालिकेच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत निया शर्मा तिच्या खासगी आयुष्याविषयी, लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. "मला असा पार्टनर अजिबात नको ज्याला माझ्यासोबत असताना इतर पाच-सात मुलींमध्ये रस असेल", असं ती म्हणाली.

याविषयी निया पुढे म्हणाली, "प्रामाणिक नसलेल्या मुलासोबत वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. आज तुम्ही त्याला डेट केलं नाही तर तो दुसरीकडे जाईल. तिने नकार दिला तर तो तिसरीकडे जाईल. जर तुम्ही त्याच्यासाठी खास नसाल तर, त्या नात्याचा काय अर्थ?"

या मुलाखतीत नियाला विचारलं गेलं की तिला कसा पार्टनर हवा आहे? त्यावर तिने मस्करीत सांगितलं, "मुलगा असावा, जिवंत असावा, चांगला असावा आणि एकाच मुलीसोबत पार्टनर म्हणून राहणारा असावा."

नियाच्या मते रिलेशनशिपच्या बाबतीत ती 'ओल्ड स्कूल' (जुन्या पद्धतींप्रमाणे वागणारी) आहे. "मला माझ्या पार्टनरमध्ये प्रामाणिकता दिसायला गवी. आजकाल अशी मुलं भेटत नाहीत. त्यामुळे मी सध्या सिंगलच खुश आहे."