
आपल्यापैकी अनेकांना रात्री नाईट आऊट मारायला प्रचंड आवडतं. शांत रस्ते, भयाण अंधार आणि किलबिलाट नसलेले वातावरणाची मजा काही वेगळीच असते. पण, तुम्हाला माहीत आहे का आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये विशेषतः विष्णु पुराणात, रात्रीच्या प्रवासाबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत, तर तुमच्या मजेमुळे तुमच्यावर आयुष्यभर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते.

विष्णु पुराणात भगवान विष्णूंच्या कथा सांगितल्या आहेत. त्यात त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे. पण यात फक्त एवढंच नाही, तर यात मानवी जीवनातील अनेक रहस्यांचा उलगडाही केला आहे. त्यातच रात्री काय करु नये, याबद्दलचे काही नियम सांगितलेले आहेत.

विष्णु पुराणात नमूद केल्याप्रमाणे कोणीही रात्रीच्या वेळी स्मशानभूमी किंवा त्याच्या आसपास फिरण्याची चूक करू नका. या ठिकाणी दिवसा जाणेही धोकादायक आणि भीतीदायक असते. पण या ठिकाणी रात्री जाणे टाळावे.

कारण स्मशानभूमीमध्ये नेहमीच एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते. जी रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय होते. ही ऊर्जा आपल्या मनावर आणि मेंदूवर वाईट परिणाम करू शकते. ज्यामुळे आपले विचार आणि भावना दोन्ही नकारात्मक होऊ शकतात.

रात्रीच्या वेळी फक्त एखादे ठिकाण नव्हे तर वाईट किंवा अधार्मिक लोकांच्या संगतीत राहणंही टाळायला हवं. रात्र आहे तर मजा करु असे तुम्हाला वाटत असले तरीही अशा लोकांच्या चुकीच्या सवयी आणि नकारात्मकता तुमच्या आयुष्यातही येऊ शकते. त्यामुळे रात्री सहसा वाईट लोकांपासून दूर राहा.

रात्रीच्या वेळी चौकात, निर्मनुष्य रस्त्यांवर फिरताना खूप मजा वाटते. पण विष्णु पुराणात याबद्दल एक गंभीर इशारा देण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या अशा ठिकाणी जादूटोणा किंवा तंत्र-मंत्राचे प्रयोग केले जातात. या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा वावर असतो.

या ठिकाणी कधीकधी तांत्रिक क्रिया केल्या जातात. ज्यामुळे आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही रात्रीचा प्रवास करायचा विचार करत असाल तर त्यापूर्वी या गोष्टी नक्की पाळा. नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)