तब्बल 5 महिन्यानंतर पूर्ण झाली नीता अंबानींची ही साडी, कार्यक्रमातील लोक बघतच राहिले, नेमकं साडीमध्ये विशेष काय?

नीता अंबानी यांची ही साडी तयार करण्यासाठी लागली 5 महिने. हातमागावर विणलेल्या बनारसी साडीमधील नीता अंबानीच्या लुकने वेधलं सर्वांचं लक्ष. पाहा फोटो.

| Updated on: May 14, 2026 | 3:03 PM
1 / 6
भारतीय परंपरा, हस्तकला आणि शाही सौंदर्य यांचा अप्रतिम संगम पुन्हा एकदा पाहायला मिळाला तो म्हणजे नीता अंबानी यांच्या नव्या रॉयल लूकमधून. आपल्या खास फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असलेल्या नीता अंबानी यांनी अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष डिनर पार्टीमध्ये हाताने विणलेली बनारसी साडी परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भारतीय परंपरा, हस्तकला आणि शाही सौंदर्य यांचा अप्रतिम संगम पुन्हा एकदा पाहायला मिळाला तो म्हणजे नीता अंबानी यांच्या नव्या रॉयल लूकमधून. आपल्या खास फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असलेल्या नीता अंबानी यांनी अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष डिनर पार्टीमध्ये हाताने विणलेली बनारसी साडी परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

2 / 6

ही खास डिनर पार्टी Nita Mukesh Ambani Cultural Centre येथे आयोजित करण्यात आली होती. वेनिस बिएनालेमध्ये इंडिया पॅव्हेलियनच्या पुनरागमनाच्या आनंदात हा खास सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते, मात्र सर्वाधिक चर्चा रंगली ती नीता अंबानी यांच्या शाही आणि पारंपरिक लूकची.

3 / 6

या कार्यक्रमासाठी नीता अंबानी यांनी खास बनारसी ब्रोकेड कढवा साडीची निवड केली होती. ही साडी तयार करण्यासाठी तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लागल्याचे सांगितले जात आहे. या साडीची खासियत म्हणजे ती पूर्णपणे हाताने विणण्यात आली असून तिच्यावर करण्यात आलेले नाजूक काम भारतीय हस्तकलेची समृद्ध परंपरा दर्शवते.

4 / 6

ही सुंदर साडी प्रसिद्ध मास्टर कारागीर अशफाक अन्सारी आणि हबीबुर्रहमान यांनी आपल्या कौशल्याने तयार केली आहे. साडीवरील बारीक डिझाइन, आकर्षक रंगसंगती आणि पारंपरिक विणकामामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.

5 / 6

साडीसोबत नीता अंबानी यांनी प्रसिद्ध फॅशन डिझायनर Manish Malhotra यांनी डिझाइन केलेला लेस ब्लाउज परिधान केला होता. हा ब्लाउज त्यांच्या संपूर्ण लूकला अधिक एलिगंट आणि रॉयल टच देत होता.

6 / 6

याशिवाय त्यांच्या दागिन्यांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी ‘रत्ना रिविएर’ नावाचा खास नेकलेस परिधान केला होता. हा नेकपीस विशेष त्यांच्या आवडीनुसार तयार करण्यात आला असून त्यामध्ये बर्मी रुबी, कोलंबियन एमराल्ड, व्हाईट डायमंड आणि यलो डायमंड्सचा वापर करण्यात आला आहे. या दागिन्यामुळे त्यांचा संपूर्ण लूक अधिक आकर्षक आणि आलिशान दिसत होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us