Nita Ambani: एक साडी नेसवण्याचे लाखो रुपये, नीता अंबानी साडी ड्रेपरला किती रुपये देतात?
Nita Ambani: नीता अंबानी या कायमच त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. एका लूकसाठी त्या लाखो रुपये खर्च करतात. आता नीता अंबानी यांना एका वेळी साडी नेसवण्यासाठी साडी ड्रेपर किती पैसे घेतो? याची चर्चा सुरु आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये भारतातील मुकेश अंबानी यांचा सहभाग आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेले अंबानी कुटुंब लग्झरी आयुष्य जगतात. नीता अंबानींच्या प्रत्येक लूकची चर्चा रंगते. त्या अनेकदा साडी नेसून कार्यक्रमात दिसतात. पण त्यांना कोण साडी नेसवते आणि एका वेळी साडी नेसवण्याचे किती रुपये घेतले जातात? चला जाणून घेऊया...
भारतात अनेक साडी ड्रेपर आहेत, पण नीता अंबानी या डॉली जैन यांच्याकडून साडी नेसवून घेततात. त्यांनी नेसवलेली साडी नीता अंबानी यांना विशेष आवडते.
नीता अंबानी यांच्या आवडत्या साडी ड्रेपर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉली जैन यांना एक साडी नेसवण्यासाठी ३५ हजार ते ५ लाख रुपयेपर्यंत मोबदला मिळतो. नीता अंबानी देखील अशाच रेंजमध्ये त्यांना पैसे देत असल्याचे म्हटले जाते.
डॉली जैन यांना ३२५ वेगवेगळ्या स्टाईलमध्ये साडी नेसवता येते. त्यांनी १८.५ सेकंदात साडी नेसवण्याचा विक्रम करत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. नीता अंबानी, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा यांसारख्या सेलिब्रिटींना आणि अनेक उद्योगपती कुटुंबातील महिलांना त्यांनी साडी नेसवली आहे.
साडीची प्रचंड आवड असल्याने त्यांनी या आवडीला व्यवसायाचे रूप दिले. आज त्या भारतातील सर्वात महागड्या आणि प्रसिद्ध साडी ड्रेपर मानल्या जातात. त्या नीता अंबानींच्या देखील आवडत्या साडी ड्रेपर असल्याचे म्हटले जाते.