
वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी भावनिक क्षण पाहायला मिळाला.

नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमात टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा केला. यामध्ये रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि सुर्यकुमार यादव यांनी हजेरी लावली होती. यावेळी हार्दिकबाबत नीता अंबानी पाहा काय म्हणाल्या.

हाच वीशीतला मुलगा ज्याचा आम्ही शोध घेतला होता. हाच तो मुलगा आहे ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये सर्वांना आपला श्वास रोखून धरायला लावला होता. हार्दिकने एक गोष्ट सिद्ध करून दाखवली की कठिण प्रसंग जास्त दिवस टिकत नाही, माणसं टिकतात, असं नीता अंबानी म्हणाल्या.

या कार्यक्रमामध्ये रोहित शर्मा आणि नीता अंबानी समोरासमोर एकमेकांना आल्यावर त्यांनी मिठी मारली.

मुंबई इंडियन्सचे तिन्ही हुकमी एक्के असलेले रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी हजेरी लावली होती.