
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती पार पडतंय.

नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. आयटीआय झालेल्यांसाठी ही खरोखरच मोठी संधी म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज उमेदवारांना नाहीये.

अप्रेंटिससाठी ही भरती होत असून यामधून 120 पदे ही भरली जाणार आहेत. 22, 23 आणि 24 फेब्रुवारीला मुलाखतीचे आयोजन हे करण्यात आले आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला nmdc.co.in/careers या साईटवर जावे लागेल. याच साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.