अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..

मुंबईच्या कांदिवलीमध्ये मराठी आणि अमराठी रिक्षाचालकांमध्ये मोठा वाद झाला. मराठी रिक्षाचालकाने अमराठी रिक्षाचालकाला रिक्षा चालवण्यास मनाई केली असता त्याला थेट मारहाण करण्यात आली.

| Updated on: Aug 24, 2026 | 11:57 AM
1 / 5
 कांदिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका मराठी रिक्षाचालकाला मारहाण झाली. अमराठी रिक्षाचालकाकडून ही मारहाण करण्यात आली. मराठी सक्तीच्या विरोधात मोठा हंगामा झाला. 

कांदिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका मराठी रिक्षाचालकाला मारहाण झाली. अमराठी रिक्षाचालकाकडून ही मारहाण करण्यात आली. मराठी सक्तीच्या विरोधात मोठा हंगामा झाला. 

2 / 5

अमराठी रिक्षाचालकाला रिक्षा चालवण्या मराठी रिक्षाचालकाने मनाई केली. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. मराठी रिक्षाचालकाचे न ऐकता त्याने थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. 

3 / 5

अमराठी रिक्षाचालकाने मराठी रिक्षाचालकाला जोरदार मारहाण केली. ज्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण बघायला मिळाले. मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षाचालक मुजोरी करताना दिसत आहेत. 

4 / 5

या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली असून अमराठी रिक्षा चालकाला पकडून कांदिवली पोलीस ठाण्यात घेऊन आले आहे. आता हा वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे. 

5 / 5

कांदिवली परिसरात अमराठी रिक्षाचालकांची दादागिरी बघायला मिळत आहे. त्यातच ही घटना घडली. यानंतर मराठी रिक्षाचालकही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us