
डान्सर-अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. ती दररोज तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे नोरा नेहमीच चर्चेचा भाग बनत असते.

नुकतेच नोराने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नोराचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. गोल्डन कलरच्या या ड्रेसमधले नोराचे बोल्ड लूकमधील हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत .

नोराचा हा शिमरी गोल्डन लूक खास फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी तयार करण्यात आला होता. फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये नोराने गोल्डन हाय थाई स्लिट गाऊन घातला होता. पुरस्कार सोहळ्यापूर्वीचा फोटो आणि व्हिडीओ नोरोने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सेलिब्रिटींनी नोराच्या या फोटोवर आणि व्हिडीओंवर कमेंट केल्या आहेत. नोराच्या चाहत्यांचे तिच्या या लूकवरून डोळेच हटत नाहीयत. तिच्या या फोटोला आतापर्यंत तब्बल 16 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

नोरा अलीकडे मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती. मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे नोरा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती. नोराची खासियत अशी आहे की, तिचा लूक प्रत्येक वेळी वेगळा आणि खास असतो. कधी ती बोल्ड लूकमध्ये, तर कधी पारंपारिक लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. नोराचा पारंपारिक अवतारही तिच्या चाहत्यांना खूप आवडतो