Libya Flood : आधी चक्रीवादळ आलं आता पूर… 5 हजार लोकांचा मृत्यू अन् 10 हजार जण बेपत्ता
Libya Storm Daniel floods Photos : पुराने घेतला हजारो लोकांचा जीव आता चक्रीवादळाचं संकट; 5 हजार लोकांचा मृत्यू अन् 10 हजार लोक बेपत्ता. काळजाचं पाणीपाणी करणारी दृष्ये. लीबियातील विध्वंसाची कहानी सांगणारी दृष्ये, पाहा
1 / 5

उत्तर आफ्रिकेलीतील लीबिया या देशात सध्या पुरामुळे हाहा:कार माजला आहे. लीबिया देशातील डर्ना शहरात आलेल्या चक्रीवादळामुळे आणि पुरामुळे हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
2 / 5

आतापर्यंत इथं 5 हजार 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मागच्या 24 तासात 1500 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.
3 / 5

डेनियल या चक्रीवादळामुळे लीबियामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. या चक्रीवादळामुळे इथे पूरही आला आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झालं आहे.
4 / 5

पुरामुळे मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे तिथल्या स्थानिक नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. शिवाय शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.
5 / 5

केवळ डर्ना शहरातच नव्हे तर अल-बायदा, अल-मर्ज, टोब्रुक, ताकेनिस, अल-बायदा, बट्टा या शहरंही या पुरामुळे प्रभावित झाली आहेत.
Follow Us