
चहाच्या उत्पन्नात जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चीन या बाबतीत पहिला नंबर राखून आहे. परंतू चहाचा खप कुठे जास्त होतो याचा विचार केला तर हे सर्वाधिक लोकसंख्येचे देश पिछाडीवर आहेत.

चहाच्या खपाच्या बाबती तुर्कीए या देशाने बाजी मारलेली आहे, आकड्यांचा विचार करता तुर्कीएत प्रति व्यक्ती चहाचा वार्षिक खप ३.१६ किलोग्रॅमच्या जवळपास आहे.

तर चहाच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात तुर्कीएचा क्रमांक पाचवा आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचा क्रमांक आहे. तेथे प्रति व्यक्ती चहाचा खप २.१९ किलो असा आहे.

चहाच्या खपाच्या बाबती ब्रिटनचा क्रमांक तिसरा आहे. येथे दरवर्षी एक व्यक्ती सरासरी १.९४ किलो चहा गटवून टाकतो. तर या यादीत चौथ्या क्रमांकावर आपला शेजारी पाकिस्तान आहे.

चीन आणि भारत असे दोन देश आहेत जे सर्वाधिक चहाचे उत्पादन करतात, परंतू चहा पिण्याच्या बाबती ते पहिल्या दहामध्ये देखील येत नाहीत. भले मग चहाचे शौकीन कितीही असोत.

दरवर्षी सर्वाधिक चहा पिण्याच्या बाबतीत चीन १९ व्या क्रमांकावर आहे. तर भारताचा क्रमांक याबाबतीत २३ वा आहे. तर चीनमध्ये प्रति व्यक्ती चहाचा खप ०.५७ किलो आहे. तर भारतात हेच प्रमाण ०.३२ किलो आहे.