
लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर व्यक्तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही समाजामध्ये लग्नाला महत्त्वाचं स्थान आहे.

लग्नाचे वेगेवगेळे प्रकार आहेत. कोणी अरेंज मॅरेज करतं, कोणी लव्ह मॅरेज करतं, अनेक जण आपल्या धर्माच्या प्रथा परंपरेनुसार लग्न करतात, तर कोणी रजिस्टर मॅरेज करतात.

मात्र तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही.

ही प्रथा छत्तिसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात पाहायला मिळते. बस्तरमध्ये अजूनही या प्रथेचं पालन केलं जातं.

बस्तरमध्ये एक विशिष्ट समाज आहे, त्या समाजामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. या जातीमध्ये लग्नापूर्वी प्रेम आणि सुहागरात्र बनवणं हे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय लग्ननच करता येत नाही.

या परंपरेचं नाव आहे घोटूल, या परंपरेला या जातीमध्ये अत्यंत पवित्र असं स्थान आहे, मुरिया जातीच्या लोकांमध्ये या परंपरेचं पालन केलं जातं. हे लोक गोंड आदिवासी समाजाशी संबंधित आहेत.

मिडिया रिपोर्ट्सनुसार ही परंपरा लिंगो पेन अर्थात लिंगो देव यांनी चालू केली होती, असं मानलं जातं.