
अनेकदा तरुण किंवा तरुणी आपल्या जुन्या प्रेमाला विसरत नाहीत. प्रियकर किंवा प्रेयसी आयुष्यातून निघून गेल्यानंतर जगण्याला अर्थच उरला नाही, असे काही लोकांना वाटते. परंतु हे सगळं विसरून आयुष्यात पुढे जाणं फार गरजेचं असतं. त्यासाठी काय करावं हे अनेकांना सूचत नाही.

प्रिय व्यस्ती आयुष्यातून गेल्यानंतर जीवनात पुढे कसं जायचं, याबाबत स्पिरिच्यूअल गुरु ओशो यांनी काही सल्ले दिलेले आहेत. या सल्ल्यांचे पालन केल्यास आयुष्यात पुढे जाऊन सुखी जीवन जगण्यास मदत मिळते. त्यांनी काही फार मोलाचे सल्ले दिलेले आहेत.

तुमच्या जुन्या आठवणींचा कधीही गुलाम होऊ नये. एकदा आठवणींचा गुलाम झालं की आयुष्यात पुढे जाता येत नाही. त्यामुळेच जुन्या आठवणी विसरायला शकले पाहिजे. शेवट हीच सुरुवात असते, अशी ओशो यांची शिकवण आहे.

त्यामुळेच स्वत:ची आणखी प्रगती करण्याची ही एक नामी संधी असते. एक प्रेम आयुष्यातून निघून गेल्यानंतर नवे नाते शोधण्याची हीच एक चांगली संधी असते. त्यामुळेच आठवणींना विसरलायला हवे, असे ओशो सांगतात.

प्रेम एक भावना आहे. आयुष्यात अनेक व्यक्तींसोबत प्रेम होऊ शकते. त्यामुळे एखादी व्यक्ती आयुष्यातून गेल्यास रडत बसू नये. स्वत:वर प्रेम करायला शिकावे. आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्याला नवी शिकवण देत असते, असे ओशो सांगतात. (टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. टीव्ही 9 मराठी या मतांशी सहमत असेलच असे नाही. अधिक माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, जाणकारांशी संपर्क करा)