
पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स पाकिस्ताना इंटरनॅशनल एअरलाईन्स (पीआयए) ही विमान वाहतूक कंपनी विकण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या विमान विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी 135 अब्ज पाकिस्तानी रुपये म्हणजेच 4300 कोटी भारतीय रुपयांत विकण्यात आल आहे.

कधीकाळी पीआयए या प्रवासी विमान वाहतूक कंपनीचा जगभरात दबदबा होता. मात्र चुकीच्या व्यवस्थापनाचा फटका बसल्यामुळे शेवटी पाकिस्तानी सरकारला ही कंपनी विक्री काढावी लागली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे या कंपनीच्या विक्रीसाठी बोलीची प्रक्रिया पार पडण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तामनधील हबीब ग्रुप, लकी सिमेंट आणि खासगी विमान वाहतूक कंपनी एअरब्लूने पीएयएच्या खरेदीसाठी बोली लावली होती. परंतु आरिफ हबीब या उद्योग समूहाने ही मोठी बोलू लावून पीआयए विमान वाहतूक कंपनी खरेदी केली.

पीआयए ही कंपनी ज्या उद्योग समूहाने खरेदी केली आहे, त्या उद्योग समूहाचे मालक आरिफ हबीब आहेत. ते पाकिस्तानमधील मोठे उद्योगपती आहेत. ते मल्टी सेक्टर ग्रुप आरिफ हबीब कॉर्पोरेशन लिमिटेडचे संस्थापक आणि सीईओ आहेत. मॅन्यूफॅक्चरिंग, फायनान्स, रिअल इस्टेट, एनर्जी सेक्टरमध्ये या उद्योग समूहाचे काम चालते.

दरम्यान, पीआयए ही विमान वाहतूक कंपनी खरेदी करणारे आरिफ हबीब यांचे भारताशी खास नाते आहे. ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार आरिफ हबीब यांचे आई-वडील चहाशी संंबंधित व्यवसाय करायचे. ते गुजरातमधील बंटवा येथील रहिवासी होते. भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर हबीब यांचे आई-वडील पाकिस्तानमध्ये वास्तव्यास गेले.