
पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या बातमीनुसार येथील लोक दिवसभर नदीच्या तळाचा गाळ उपसत आहेत. आणि बादल्या भरुन सोने वाहून घरी नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या माती आणि वाळूतून स्लुईस मॅटचा वापर करुन त्यातून सोनं काढण्याचा प्रयत्न करीत आहे.

पाकिस्तान स्थित पंजाबचे माजी खान आणि खनिज मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी पाकिस्तानच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण ( GPS ) अहवालाच्या आधारे अटक जवळ ८०० अब्ज रुपयांच्या सोन्याच्या भंडाराचा दावा केला आहे.

डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार या परिसरात आधी छोट्या प्रमाणावर खाणकाम सुरु होते. परंतू आता येथे मोठ्या संख्येने लोक खोदकाम करण्यासाठी जमा झाले असून लोक बादली भरुन येथील वाळू आपल्या घरी नेत आहेत.

हसन मुराद यांनी दावा केला आहे की या सोन्याच्या शोधाने पाकिस्तानचे नशीब बदलू शकते. त्यांनी येथे १८ हून अधिक साईटवर सोने सापडू शकते असा दावा केला आहे

. संपूर्ण ९ ब्लॉकच्या या परिसरात सर्वात मोठ्या ब्लॉकमध्ये १५५ अब्ज सोने असू शकते असा दावा माजी खान आणि खनिज मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी केला आहे

या आधी पाकिस्तानात क्रुड ऑईलचा मोठा साठा सापडल्याची बातमी आली होती. आता सोन्याचा साठा भूगर्भात असल्याचा दावा केला जात असल्याने आर्थिक अडचणी सापडलेल्या पाकिस्तानला आता निसर्गानेच मदत केली की काय असा सवाल केला जात आहे.