सख्ख्या बहिणीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न, विघ्न आणण्यासाठी मी… प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थक्क करणारा प्रसंग
अभिनेत्री पल्लवी जोशीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बहिणीच्या लग्नाशी संबंधित मजेशीर आठवण सांगितली. वयाच्या 18 व्या वर्षी ताईच्या प्रेमविवाहाला विरोध करत तिने अनेक प्रयत्न केले होते. वय लहान असल्यामुळे तिला ते आवडतचं नव्हतं की आपल्या बहिणीने असंच कोणाच्या घरी जावं कायमसाठी.

पल्लवीची बहीण पद्मश्री जोशी यांच्या लग्नाच्या वेळी ती 18 वर्षांची होती. विजय कदम तिला त्यावेळी अजिबात आवडत नव्हते. ताई आपल्यापासून दूर जात असल्याचे तिला वाटत होते.
विजय कदम यांचा फोन आला की पद्मश्री यांचे लक्ष त्यांच्याकडे असायचे. त्यामुळे ताई आपल्याला पूर्वीसारखा वेळ देत नाहीत, अशी भावना पल्लवीच्या मनात निर्माण झाली होती.
विजय यांचा फोन येणार असल्यामुळे ताई अनेकदा घरीच थांबायच्या. 'बाबा, विजयचा फोन येणार आहे ना? मग आता नको जाऊ. त्याला सांग ना की तू बाहेर गेली आहेस. संध्याकाळी करेल तो फोन,' असे त्या म्हणायच्या.
ताई आणि विजय कदम यांचे लग्न होऊ नये, यासाठी पल्लवीने अनेक प्रयत्न केले होते. लग्नात अडथळे आणण्याचाही तिने प्रयत्न केल्याचे मुलाखतीत सांगितले.
आज या प्रसंगाची आठवण सांगताना पल्लवीला स्वतःच्या वागण्याचे हसू येते. बहिणीवरील प्रेम आणि तिचा सहवास कमी होण्याची भीती यामागे होती. तिच्या या किस्स्यामुळे बहिणींच्या नात्यातील निरागस प्रेमाची झलक पाहायला मिळाली.