Panipuri Recipe : पाणीपुरीचं पाणी बनवण्याची सोपी रेसिपी, चव येईल अगदी ठेल्यासारखी
पाणीपुरीचं आंबट, तिखट आणि गोड पाणी खाण्याची मजा काही औरच असते. पुदिना, कोथिंबीर आणि खास मसाल्यांच्या मदतीने घरीच बनवा चटपटीत पाणी.

पानीपुरीचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. मग आठवतो तो पाणीपुरीचा ठेला पाणीपुरी विकणारा भैया. त्यासोबतच त्याचे घाणेरडे हात, मग पाणीपुरी जरी कितीही आवडत असली तरी त्याचे हात बघून कधीकधी खाण्याची इच्छाचं मरून जाते.
पाणीपुरीची खरी मज्जा असते तर त्या आंबट, तिखट, गोड पाण्यात असते. हेच चटपटीत पाणी घरच्या घरी देखील करू शकता सेम भैयाच्या ठेल्याची चव येईल.
सगळ्यात आधी ताजा पुदिना आणि कोथिंबीर घ्या. यासोबत हिरवी मिरची, थोडं आलं आणि चिंचेची पेस्ट लागेल. चवीसाठी काळं मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि थोडी साखर वापरू शकता
सर्वात आधी पुदिना,कोथिंबीर, आलं,हिरवी मिरची आणि चिंचेचा पेस्ट मिक्सरमध्ये घ्या. हे सगळं व्यवस्थित बारीक करून गुळगुळीत हिरवट पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट एका भांड्यात काढून घ्या.
यामध्ये काळं मीठ, भाजलेली जीर पावडर, चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि थोडी साखर घाला. आवश्यकतेनुसार पाणी मिसळा.हे पाणी 6 ते 7 तास फ्रिजमध्ये ठेवा,म्हणजे चव व्यवस्थित मुरेल.
मसाला सुद्धा करा घरीच तयार : मसाला तयार करण्यासाठी आमचूर पावडर,भाजलेलं जिर पावडर, लाल तिखट, काळी मिरी पावडर, बडीशेप पावडर, काळं मीठ, साधं मीठ आणि हिंग घ्या
हे सगळे मसाले एकत्र करून हवाबंद डब्यात ठेवा. नेहमी पाणीपुरी बनवताना पुदीना, कोथिंबीर,हिरवी मिरची आणि थोडं आलं मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात हा मसाला आणि पाणी मिसळलं की कमी वेळात चटपटीत पाणी होईल तयार