
परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 23 आणि 24 सप्टेंबर 2023 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडणार आहे.

विशेष म्हणजे उदयपूर येथील अत्यंत लग्झरी अर्थात लीला पॅलेसमध्ये यांचे लग्न पार पडणार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला जाणून मोठा धक्का बसेल की, लीला पॅलेसच्या एका रूमचा किराया हा तब्बल 8 लाखांपेक्षाही जास्त आहे.

लीला पॅलेसच्या एका रूमचे एका रात्रीचे भाडे हे (महाराजा सुइट) 8 लाख रूपये आहे. लीला पॅलेस हे अत्यंत लग्झरी हाॅटेल आहे. इथे सर्व सुविधा देखील आहेत.

याच लीला पॅलेसमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्न करणार आहेत. अत्यंत शाही पद्धतीने राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा विवाह पार पडणार आहे.

लीला पॅलेसमध्ये पूल, सलून, स्पा, बोटिंग, लाईव्ह म्यूझिक अशा बऱ्याच सुविधा देण्यात येतात. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे अत्यंत जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये लग्न होईल.