
परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा हे नुकताच पंजाबमधील सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेले होते. याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले.

आता नुकताच अजून काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये गुरुद्वाऱ्यामध्ये परिणीती आणि राघव हे सेवा करताना दिसत आहेत.

गुरुद्वाऱ्यामध्ये भांडणे धुण्याची सेवा करताना परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दिसत आहेत. आता याचे काही फोटो हे व्हायरल होत असून अनेकांनी हे फोटो पाहून त्यांचे काैतुक केले आहे.


परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली. यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. गेल्या काही वर्षांपासून हे एकमेकांना डेट करत होते.