
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे सध्या त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न आज शाही पद्धतीने उदयपूर येथे पार पडतंय.

आता अगदी काही वेळामध्येच लग्नाच्या कार्यक्रमांना सुरूवात होतीये. परिणीती चोप्रा हिच्या चूड्याच्या कार्यक्रमाला सुरूवात होईल.

दुसरीकडे राघव चड्ढा याला सेहरा बांधला जाईल. त्यानंतर राघव चड्ढा हा बारात घेऊन लीला पॅलेसमध्ये परिणीती चोप्रा याच्याकडे पोहचेल.

नुकताच राघव चड्ढा याची फॅमिली फोटोसाठी पोझ देताना दिसली आहे. लग्नाची जवळपास सर्वच तयारी झाल्याचे दिसत आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. चाहते यांच्या लग्नाच्या फोटोची वाट पाहत आहेत.