तब्बल 3 तास नुसती रडत होते.. कामासाठी मुलाला घरी सोडताना अभिनेत्रीला प्रचंड गिल्ट ; सांगितला भावनिक अनुभव

अभिनेत्री परिणीती चोप्राने 'शक' या सीरिजने ओटीटी विश्वात पदार्पण केले. मात्र, आपल्या बाळाला नीरला घरी सोडून कामावर परत आल्यावर तिला तीव्र 'मॉम गिल्ट'चा सामना करावा लागला. मुलासोबत अनेक महिने राहिल्याने कामावर जाताना प्रचंड भावनिक त्रास झाला. "मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या वेदनादायक" म्हणत, तिने कामासाठी मुलाला सोडल्यावर अक्षरशः तीन तास रडल्याचा अनुभव कथन केला. हा क्षण तिच्यासाठी खूपच कठीण होता.

| Updated on: Sep 29, 2026 | 4:40 PM
1 / 7
चित्रपटांमध्ये नशीब आजमावल्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्राने आता ओटीटी विश्वातही पदार्पण केलं आहे. तिची 'शक' ही सीरिज नुकतीच रिलीज झाली. त्यामध्ये जेनिफर विंगेट देखील तिच्यसोबत प्रमुख भूमिकेत दिसली. आपल्या मुलीच्या शोधात असलेली आई, या भोवती या सीरिजची कथा फिरते. याचदरम्यान परिणीतीने आई होण्याचा प्रवास आणि आपल्या बाळाला घरी सोडून कामावर परत येण्याचा अनुभव, याबद्दल भाष्य केलं. ( All Photos : Instgram)

चित्रपटांमध्ये नशीब आजमावल्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्राने आता ओटीटी विश्वातही पदार्पण केलं आहे. तिची 'शक' ही सीरिज नुकतीच रिलीज झाली. त्यामध्ये जेनिफर विंगेट देखील तिच्यसोबत प्रमुख भूमिकेत दिसली. आपल्या मुलीच्या शोधात असलेली आई, या भोवती या सीरिजची कथा फिरते. याचदरम्यान परिणीतीने आई होण्याचा प्रवास आणि आपल्या बाळाला घरी सोडून कामावर परत येण्याचा अनुभव, याबद्दल भाष्य केलं. ( All Photos : Instgram)

2 / 7

कामासाठी जेव्हा मुलाला घरी सोडून यावं लागलं, तेव्हा मला खूप गिल्ट आलं होतं. मानसिक आणि शारीरिक रित्याही हा माझ्यासाठी खूपच वेदनादायक क्षण होता, असं 'इंडिया टुडे' शी बोलताना परिणीतीने सांगितलं.

3 / 7

माझ्या मुलाला घरी सोडून मी जेव्हा कामावर परत आले, तेव्हा खूप भावूक झाले होते. मी इतकी त्रस्त होते की सतत 3 तास मी नुसती रडत होते. आजूबाजूला काय घडतंय याची मला जराही जाणीव नव्हती, असं म्हणत तिने तो अनुभव कथन केला.

4 / 7

मुलगा नीरच्या जन्मानंतर मी अनेक महिने त्याच्यासोबत घरीत होते. दरवेळेस, प्रत्येक क्षणाला मी त्याच्यासोबत होते. त्यामुळे जेव्हा कामावर जायची वेल आली तेव्हा मला खूप गिल्टी वाटलं. 'मॉम गिल्ट' या शब्दाचा अर्थ खूपच गहन आणि तीव्र असतो, असं परिणीतीने यावेळी नमूद केलं.

5 / 7

वर्क ट्रीपच्या अनुभवाबद्दलही ती बोलली. पहिल्यांदाच मी माझ्या मुलाला (घरी) सोडून जात होते. त्याच्या जन्मानंतर अनेक महिन्यांनी खरंतर हे घडलं, त्याआधी मी अगदी 24/7 त्याच्यासोबतच असायचेय

6 / 7

मी जेव्हा पहिल्यांदा त्याला सोडून आले, तेव्हा इतर कोणत्याही गोष्टींकडे माझं लक्ष नव्हतं. मुंबईची फ्लाईट, प्रवास कसा झाला तेही माझ्या लक्षात नाही. मी एअरपोर्टला कध पोहोचले, फ्लाईटमध्ये कधी बसले, कधी उतरले आणि कधी घरी आले, मला काही काही लक्षात नाही. जवळपास 3 तास मी नुसती रडत होते - अशा शब्दांत तिने तिचा भावनिक अनुभव सांगितला.

7 / 7

त्यावेळी कामावर परत जाणं मला अगदीच अशक्य वाटत होतं. मला खूपच गिल्टी वाटत होतं, असं वाटलं की मी काहीच करू शकणार नाही. तो खूप थकवणारा अनुभव होता, असं परिणीतीने नमूद केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us