
चमकदार त्वचेसाठी परिणीती चोप्रा फॉलो करते खास स्किन केअर रुटीन. त्यामुळे मेकअप नसताना सुद्धा परिणीती छानच दिसते. याशिवाय हेवी मेकअप केला तरी तिची त्वचा खूप सुंदर दिसते. तुम्हालाही अशी स्किन हवी असेल तर तुम्ही हे रुटीन फॉलो करू शकता.

दिवसाच्या सुरुवातील परिणीती फेसवॉश करते. तिच्या त्वचेनुसार ती क्लींजरचा वापर करते. चेहऱ्यासोबतच मानेवर सुद्धा या गोष्टी लावल्या जातात.

त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावलं जातं. हे मॉइश्चरायझर परिणीती चेहऱ्यावर आणि मानेवर लावते. चांगल्या क्वालिटीचे मॉइश्चरायझर ती वापरते.

परिणीती चोप्रा मॉइश्चरायझर म्हणून कोरफड जेलचा वापर करते. ही कोरफड त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि तेही खोलवर. कोरफड जेलमुळे त्वचा शांत होते. त्वचेचा सनबर्नपासून बचाव होतो.

ओठांचा कोरडेपणा टाळण्यासाठी परिणीती लिप बाम लावते. हे लिप बाम नेहमी तिच्या सोबतच असतं. याशिवाय निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी परिणीती जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स समृद्ध पदार्थ देखील खाते.