
महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणरायाची चाहूल आता चाकरमान्यांना लागलीये. त्यामुळे आता चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात जवळपास 6 ते 7 लाख चाकरमानी येत असतात. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी येवू शकले नव्हते. मात्र, यंदा पाच ते सहा दिवस आगोदरच चाकरमानी कोकणात दाखल होवू लागलेत.

सध्या फेस्टिव्हल ट्रेनच्या माध्यमातून मुंबईतून चाकरमानी कोकणात दाखल होवू लागले आहेत. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सामानासकट चाकरमानी रत्नागिरीत दाखल झाले आहेत.

रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनवर सकाळी येणाऱ्या सर्वच ट्रेन सध्या चाकरमान्यांनी भरुन असलेल्या पहायला मिळत आहेत.

गणेशोत्सवासाठी सेलिब्रेशनचे प्लॅनिंग करुन चाकरमानी रत्नागिरीत दाखल होताहेत.