पेट्रोल-डिझेलची दरवाढ? सरकारी तेल कंपन्यांचे शेअर एकदम सुसाट, गौड’बंगाल’ काय?

ONGC- Oil India Shares Hike: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीसह सोने न खरेदीच्या सल्ल्याने देशावासियांना चिंतेत ढकलले आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसला. दोन दिवसांपासून बाजार धपकन आपटला. पण सरकारी तेल कंपन्यांचे शेअर सुसाट आहेत.

| Updated on: May 12, 2026 | 5:09 PM
1 / 6
ONGC- Oil India Shares Hike: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीवर भर दिला. पेट्रोल-डिझेल कमी वापण्याचा सल्ला दिला. खाद्यतेलाचा वापरही कमी करण्याचा सल्ला दिला. तर त्याचवेळी सोने ने खरेदीचे आवाहन केले त्याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला.

2 / 6
गेल्या दोन दिवसांपासून बाजारात घसरणीचे सत्र आहे. सेन्सेक्स 800 अंकांनी घसरला. तर निफ्टीने घसरणीचे दुहेरी शतक ठोकून गोंधळ उडवला आहे. आयटी इंडेक्स झोपलाय. तर  खासगी बँका, बँक निफ्टी, निफ्टी पीएसयू बँक हे लालेलाल झाले आहेत.

3 / 6
या दोन शेअरच्या मुर्दुमकीवर निफ्टी ऑईल अँड गॅस इंडेक्स हिरव्या रंगात न्हाऊन निघाला आहे. बाकी सर्व बाजाराला लाल रंगाचे वेड लागले आहे. सरकारने ऊर्जा क्षेत्राला वाचवण्यासाठी काही पावलं टाकली आहेत. सध्या देशाकडे दोन महिने पुरेल इतका इंधन साठा आहे.

4 / 6
त्यामुळे ओएनजीसी आणि ऑईल इंडिया सारख्या सरकारी कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. ऑनशोर क्रूड ऑईलवरील रॉयल्टी 16.66 टक्क्यांहून थेट 10 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. नैसर्गिक गॅसवरील रॉयल्टी 10 टक्क्यांहून 8 टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

5 / 6
मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या जवळपास ओएनजीसीचा शेअर 5.84 टक्क्यांनी वाढून 295.40 रुपयांवर ट्रेड करता होता. तर ऑईल इंडियाचा शेअर 8.63 रुपयांनी वधारून 495.35 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यामुळे एकीकडे भीतीचे वातावरण असले तरी बाजारात या दोन सरकारी तेल कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us