Photo : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं लग्न, दिग्गजांची मांदियाळी; शरद पवार, फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीय नेते उपस्थित

| Updated on: May 27, 2022 | 11:24 PM

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत आणि पुण्यातील अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त स्वागत समारंभ आज पुण्यात पार पडला. या स्वागत समारंभाला नेते मंडळींसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

1 / 8
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत आणि पुण्यातील अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त स्वागत समारंभ आज पुण्यात पार पडला.

2 / 8
या स्वागत समारंभाला नेते मंडळींसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

3 / 8
योगगुरू बाबा रामदेव यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. तसंच बावनकुळे यांची गळाभेट घेत मुलाच्या लग्नाबद्दल त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

4 / 8
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उपस्थिती लावत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. उद्योजक गौतम अदानीही यावेळी उपस्थित होते.

5 / 8
तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.

6 / 8
नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी जोडीने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

7 / 8
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवदाम्पत्याला फुलांचा छान बुके आणि चॉकलेट देत शुभेच्छा दिल्या.

8 / 8
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही बावनकुळे परिवाराच्या शुभकार्यात हजेरी लावली आणि नवरा-नवरीला आशीर्वाद देत एक भेटवस्तूही दिली.