
मागच्या दहा वर्षापुर्वी सुध्दा तिथं असाचं पाऊस झाला होता. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहातून एक मोठा दगड आला होता. त्यामुळे केदारनाथ मंदीर सुरक्षित राहिले होते.

हिमाचल प्रदेशात बहुतांश ठिकाणी सगळीकडं पाणीचं पाणी आहे. पुराचं पाणी प्रचंड असल्यामुळे डोंगर आणि मोठी घरं उद्धवस्त झाली आहेत. विशेष म्हणजे यावेळी पंचवक्त्र मंदिराला काहीही झालेलं नाही.

पुराचं पाणी ज्यावेळी निघून गेलं, त्यावेळी मंदीर जसं होतं तसं पाहायला मिळालं. फक्त आतमध्ये पाण्यामुळे आलेला गाळ पाहायला मिळाला. परिसरात गाळ असल्यामुळे नंदीची फक्त शिंग दिसत होती.

ज्यावेळी मंदीरातील सगळा गाळ काढला त्यावेळी शिवलिंग नंदी आणि मंदीराची शिल्प सुध्दा जशी होती तशीचं पाहायला मिळाली.

मंदीराच्या शिखरापर्यंत ब्यास नदीचं पाणी पोहोचलं होतं, परंतु महादेवाच्या मंदीराला नदीच्या प्रवाहामुळे कसलाही त्रास झालेला नाही.

मंडी जिल्ह्यातील पंचवक्त्र शिव मंदिर 300 वर्षे जुनं आहे. त्याला राजा सिद्ध सेनने 1684-1727 दरम्यान तयार केलं होतं.

त्या मंदीरात पंचमुखी शिवची स्थापना केली आहे, तिथं पंचमुखी शिव प्रतिमा असल्यामुळे त्या मंदीराला पंचवक्त्र असं नाव देण्यात आलं आहे.

पंचवक्त्र मंदिराला पुराच्या पाण्यांनी पुर्णपणे वेढलं होतं, परंतु मंदीराला जरा सुध्दा नुकसान झालं नाही. विशेष म्हणजे पुरामुळे मंदीराची एकही वीट हललेली नाही.