
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. तारखेनुसार दरवर्षी शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. तर यंदा तिथीनुसार शिवजयंती आज साजरी केली जात आहे. आज शिवजयंतीनिमित्त इस्त्रायलचे राजदूत को. बी. शोषानी शिवनेरीवर आले आहेत.

राज्यभरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तर शिवनेरी किल्ल्यावरी शिवजयंतीचा उत्साह आहे. या ठिकाणी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे.

शिवनेरीवर आलेल्या इस्त्रायलच्या राजदूतांनी यावेळी ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. यावेळी त्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. तर शिवनेरीविषयी जाणून घेतलं.

इस्त्रायलच्या राजदूतांना ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी शिवप्रेमींसोबत फोटोही काढले. शिवनेरी किल्ल्यावरी शिवजयंतीचा उत्साह आहे. या ठिकाणी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे.

राज्यभरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. किल्ले शिवनेरीवरही शिवप्रेमींची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी शिवरायांचे चित्र असलेला ध्वज फडकवताना शिवप्रेमी दिसून आले.