
करण जोहरसोबत झालेल्या वादानंतर कार्तिक आर्यन पहिल्यांदाच मीडियासमोर दिसला.

कार्तिकने मास्क लावला होता. त्यानं फोटोसाठीसुद्धा मास्क काढला नाही आणि तो कॅमेरामन लोकांना मास्क न काढण्याचं आवाहन करत राहिला.

सोबतच कार्तिकनं कॅमेरामॅनला सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन केले.

कार्तिक आर्यननं तारखांमुळे बॉलिवूडमधील सर्वात मोठं प्रोडक्शन हाऊस धर्मा (Dharma) च्या दोस्ताना 2 (Dostana 2) हा मोठा चित्रपटात गमावला आहे. करण जोहरशी झालेल्या वादाचं दुसरं कारण असं सांगण्यात येतंय की कार्तिकनं कोरोनापासून बचाव करण्यासाठी शूटिंगला उशीर केला.

करण जोहरबरोबरचा वाद इतका वाढला आहे की, आता धर्मा प्रॉडक्शन टीमनं कार्तिकबरोबर पुढे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, कार्तिकला दुसर्या चित्रपटातून वगळण्यात आलं आहे. एवढंच नाही तर दुसऱ्या एका चित्रपटातूनही त्याला काढून टाकण्यात आलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शरण शर्मा करणार आहेत ज्यांनी जान्हवी कपूरबरोबर गुंजन सक्सेना हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.