PHOTO : राज्याच्या बांधकाम विभागानं करुन दाखवलं, 24 तासांत 40 किमी रस्त्याचं काम पूर्ण!

महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं 24 तासांत 40 किमी रस्ता बनवण्याची कामगिरी केली आहे.

sagar joshi | Updated on: May 31, 2021 | 11:13 PM
1 / 5
सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. 147 वर सलग 24 तास काम करून तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचं काम केलं आहे. सलग 24 तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलाय.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. 147 वर सलग 24 तास काम करून तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचं काम केलं आहे. सलग 24 तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलाय.

2 / 5

रविवारी, दि. ३० मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत सलग 24 तास काम करून तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एका लेनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही नोंद घेतली आहे.

3 / 5

कोरोनाच्या या काळामध्ये अनेक अडचणी असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते, कर्मचारी व कामगारांनी केलेली ही कामगिरी नक्कीच आनंददायी, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी संपूर्ण यंत्रणेचे मनापासून अभिनंदन करतो. अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी विभागाच्या कामगिरीचं कौतुक केलंय.

4 / 5

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामगिरीचं कौतुक खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनीही केलंय. हे काम करुन प्रकल्पाचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढविला आहे, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केलंय.

5 / 5

विक्रम रचणे ही एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र आपलाच विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करणे, ही अधिक अभिमानास्पद बाब असते. त्यामुळे पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे वापरून आणखी नवे उच्चांक नोंदवण्याची, तसेच दर्जेदार व उत्तमोत्तम काम करण्याचे आमचे धोरण आहे. अशी माहितीही चव्हाण यांनी दिलीय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us