Photo : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार, कांचर गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यांचं निमंत्रण स्वीकारलं

| Updated on: Oct 18, 2021 | 1:04 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर आता हिंदुत्वाची भूमिका अधिक आक्रमकपणे स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी राज ठाकरे आता अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जात भेट घेतली.

1 / 6
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर आता हिंदुत्वाची भूमिका अधिक आक्रमकपणे स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी राज ठाकरे आता अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

2 / 6
कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जात भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी सपत्नीक त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर राज आणि कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.

3 / 6
त्यावेळी सूर्याचार्यजी यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्याचं निमंत्रण दिलं. तसंच अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंतीही राज ठाकरे यांना करण्यात आली आहे.

4 / 6
राज ठाकरे यांनीही कांचन गिरीजी आणि सूर्याचार्यजी यांचं निमंत्रण स्वीकारलं आहे. राज यांनी दिवाळीमध्ये अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

5 / 6
कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी शिवतिर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी राज यांची भेट घेतली.

6 / 6
राज ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता. त्यानंतर आता हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी राज यांनी अयोध्येला जाण्याचं महंतांना आश्वासन दिलं आहे. त्यामुळे राज ठाकरे परप्रांतियांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाकडे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.