PHOTO : ओमराजे निंबाळकर यांच्यावरील चाकू हल्ल्याचे फोटो

| Updated on: Oct 16, 2019 | 12:28 PM

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथे ही धक्कादायक घटना घडली.

1 / 7

2 / 7
या हल्ल्यात ओम राजे निंबाळकर यांच्या हातावर माथेफिरुने तीन वार केल्याची माहिती आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.

3 / 7
ओमराजे निंबाळकर प्रचार सभास्थळी पोहोचले आणि गाडीतून उतरले. तेव्हा त्यांच्याजवळ एक तरुण आला आणि त्याने निंबाळकरांच्या हातात हात दिला आणि दुसऱ्या हाताने त्याने चाकू काढत निंबाळकरांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला.

4 / 7
मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी प्रसंगावधान दाखवत डाव्या हाताने त्याला अडवलं आणि त्यामुळे त्यांच्या हाताला जखम झाली.

5 / 7
ओमराजे निंबाळकरांवर हल्ला करुन माथेफिरु फरार झाला. हल्लेखोर माथेफिरुचं नाव अजिंक्य टेकाळे असल्याचं समोर आलं आहे.

6 / 7
या माथेफिरुला कुठल्या पक्षाने पाठवलं होतं की त्याच्या हल्ल्यामागे कुठलं दुसरं कारण होतं, हे शोधून काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.मात्र, भर दिवसा गर्दीच्या ठिकाणी प्रचार सभेदरम्यान चक्क खासदारावर हल्ला झाल्याने उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

7 / 7
ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचीही काही वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते पद्मसिंह पाटील घराण्याचे टोकाचे वैर आहेत.