
टाटा टिग्रो ही सेडान कार असून टाटा मोटर्सनं ती ड्युअल टोन कलरमध्ये सादर केली आहे. ओपल व्हाइट एक्सटीरियर कलर व्यतिरिक्त टिगोर कारमध्ये काळ्या छताचा पर्याय देण्यात आला आहे. हा कंपनीचा दुसरा ड्युअल टोन कलर पर्याय आहे. याआधी मॅग्नेटिक रेडसह ब्लॅक रूफचा पर्याय सादर करण्यात आला आहे.

या टाटा सेडान कारमध्ये 9 इंची टचस्क्रीन प्रणाली देण्यात आली आहे. यात पुश स्टार्ट आणि स्टॉप बटण आहे. तसेच रेन सेन्सिंग वायपर देण्यात आले आहेत.

टाटा मोटर्सची ही सेडान कार नवीन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करण्यासाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता, ज्यासाठी सोप्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल.

दोन ड्युअल टोन शेड्स व्यतिरिक्त, टाटा मोटर्स टिगोर सेडान तीन मोनोटोन कलर पर्यायांमध्ये ऑफर करत आहे, जे डीप रेड, अॅरिझोना ब्लू आणि डेटोना ग्रे आहेत.

Tata Tigor च्या किमतीच्या श्रेणीबद्दल बोलायचे झाले तर, ती 6 लाख ते 8.59 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ड्युअल टोन टाटा टिगोरच्या इंटीरियरमध्ये आणि फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.