
गायिका नेहा कक्कर रोहनप्रीत सिंहसोबत लग्न बंधनात अडकली आहे. या दोघांच्या हळदीचे आणि मेहंदीचे फोटो समोर आले आहेत.

नेहा आणि रोहनप्रीत दोघांनी आपल्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये दोघं एकमेकांसोबत आनंदी दिसत आहे. तसेच सोशल मीडियावर हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.

नेहानं गडद हिरव्या रंगाचा घागरा आणि त्यासोबत मॅचिंग दागिने परिधान केले आहेत.

या व्यतिरिक्त नेहानं तिच्या हातावरील मेहंदीचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत. या मेहंदीमध्ये ती रोहनप्रीतचं नाव मिरवताना दिसत आहे.

याआधी नेहानं हळदीचे फोटोसुद्धा शेअर केले होते. सोबत तिच्या हळदीचे व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.