प्लास्टिक की लाकडी, तुमच्या केसांसाठी कोणता कंगवा सर्वात उत्तम? जाणून घ्या

केसांसाठी लाकडी कंगवा वापरणे फायदेशीर आहे की प्लास्टिकचा? जाणून घ्या केसांची गळती थांबवण्यासाठी आणि नैसर्गिक चकाकी मिळवण्यासाठी कोणता कंगवा निवडावा याबद्दलची सविस्तर माहिती.

| Updated on: Feb 07, 2026 | 4:05 PM
1 / 8
केसांच्या सौंदर्यासाठी आणि मजबुतीसाठी आपण महागडे शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क वापरतो. मात्र, ज्या गोष्टीचा आपण दिवसातून किमान दोन-तीन वेळा वापर करतो, त्या कंगव्याकडे आपले अनेकदा दुर्लक्ष होते.

केसांच्या सौंदर्यासाठी आणि मजबुतीसाठी आपण महागडे शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क वापरतो. मात्र, ज्या गोष्टीचा आपण दिवसातून किमान दोन-तीन वेळा वापर करतो, त्या कंगव्याकडे आपले अनेकदा दुर्लक्ष होते.

2 / 8

बाजारात प्लास्टिकचे रंगीबेरंगी कंगवे सहज उपलब्ध असले, तरी केसांच्या आरोग्यासाठी लाकडी कंगवा हा प्लास्टिकच्या तुलनेत कैक पटीने सरस ठरत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

3 / 8

प्लास्टिक किंवा फायबरच्या कंगव्यामुळे केसांमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी (Static Electricity) निर्माण होते. यामुळे केस विंचरताना ते एकमेकांना चिकटतात किंवा उडतात.

4 / 8

तसेच प्लास्टिक किंवा फायबरच्या कंगव्यामुळे केसांचा गुंता वाढतो. त्यासोबतच केस तुटण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढते. प्लास्टिकचे दात अनेकदा तीक्ष्ण असल्याने टाळूला इजा होण्याची शक्यता असते.

5 / 8

आपल्या टाळूमध्ये नैसर्गिक तेल (Sebum) तयार होत असते. लाकडी कंगवा हे तेल मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत समान पद्धतीने पसरवतो, ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या चमकदार दिसतात.

6 / 8

लाकडी कंगव्याचे दात टाळूवर दाब निर्माण करतात, ज्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया वेगवान होते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते. तसेच लाकडी कंगवा केसांमधील गुंता सहज आणि मऊपणाने सोडवतो. यामुळे विंचरताना केस ओढले जात नाहीत. तसेच केस गळती कमी होते.

7 / 8

प्लास्टिकच्या कंगव्यामुळे टाळूवर खाज सुटणे किंवा बॅक्टेरिया तयार होण्याची भीती असते. याउलट, कडुलिंबाच्या (Neem) लाकडापासून बनवलेले कंगवे अँटी-बॅक्टेरियल असतात, जे कोंडा कमी करण्यास मदत करतात.

8 / 8

केस ओले असताना कधीही विंचरू नयेत. तसेच, लाकडी कंगवा वापरताना तो दर महिन्याला थोड्या तेलाने पुसून स्वच्छ करावा, जेणेकरून त्याचे लाकूड दीर्घकाळ टिकेल आणि केसांना अधिक फायदा मिळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us